Hello Reader
Books in your Cart

REBEL SULTANS ( MARATHI ):THE DECCAN FROM KHILJI TO SHIVAJI

REBEL SULTANS ( MARATHI ):THE DECCAN FROM KHILJI TO SHIVAJI
-20 %

Advertisement

Subscribe to us!

REBEL SULTANS ( MARATHI ):THE DECCAN FROM KHILJI TO SHIVAJI
  • Stock Status: In Stock.
  • Publisher: Westland
  • ISBN-13:  9789388754477
  • Total Pages:  320
  • Edition: 1
  • Book Language:  Marathi
  • Available Book Formats: Paperback
  • Year:  2019
  • Publication Date:  2019-10-18
No. Of Views: 372
₹319
₹399
Reward Points: 898
रिबेल सुलतान्स हे एक नेत्रदीपक कथन आहे. पिल्लई यांनी आपल्या अत्यंत प्रभावी अशा कल्पनाशक्तीचा आणि उत्तुंग शब्दप्रतिभेचा वापर करून एक अस्सल थरारक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केल्यावर संपल्याशिवाय थांबणे अशक्य आहे.- इंडियन एक्सप्रेसआपल्या प्रतिभासंपन्न आणि रसाळ शैलीने पिल्लई आपल्या वाचकांना मंत्रमुग्ध करतात...- द हिंदूरिबेल सुलतान्स, या पुस्तकामध्ये मनु पिल्लई यांनी तेराव्या शतकाच्या अंतापासून अठराव्या शतकाच्या आरंभापर्यंतची दख्खनची कथा सांगितली आहे. यात रंजक कथा आणि लक्षवेधी पात्रं यांची रेलचेल आहे. हे पुस्तक आपल्याला अल्लाऊद्दीन खिल्जीच्या युगापासून शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंतचा प्रवास घडवते.त्या काळी दख्खन ही चमत्कारांना प्रेरणा देणारी भूमी होती. इथल्या खजिन्यांची, राजेलोकांची ख्याती दूरवर पसरली होती. ही भूमी समुद्रापल्याडच्या प्रतिभावंतांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत ..
Pustak Details
Sold ByWestland
AuthorMANU PILLAI
ISBN-109388754476
ISBN-139789388754477
Edition1
FormatPaperback
LanguageMarathi
Pages320
Publication Date (YYYY-MM-DD)2019-10-18
Publication Year2019
CategoryHistory ,Region & Countries ,Asia

Reviews

Write a review

Note: HTML is not translated!
Bad Good
Captcha

Book Description

REBEL SULTANS ( MARATHI ):THE DECCAN FROM KHILJI TO SHIVAJI

रिबेल सुलतान्स हे एक नेत्रदीपक कथन आहे. पिल्लई यांनी आपल्या अत्यंत प्रभावी अशा कल्पनाशक्तीचा आणि उत्तुंग शब्दप्रतिभेचा वापर करून एक अस्सल थरारक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केल्यावर संपल्याशिवाय थांबणे अशक्य आहे.- इंडियन एक्सप्रेस

आपल्या प्रतिभासंपन्न आणि रसाळ शैलीने पिल्लई आपल्या वाचकांना मंत्रमुग्ध करतात...- द हिंदू

रिबेल सुलतान्स, या पुस्तकामध्ये मनु पिल्लई यांनी तेराव्या शतकाच्या अंतापासून अठराव्या शतकाच्या आरंभापर्यंतची दख्खनची कथा सांगितली आहे. यात रंजक कथा आणि लक्षवेधी पात्रं यांची रेलचेल आहे. हे पुस्तक आपल्याला अल्लाऊद्दीन खिल्जीच्या युगापासून शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंतचा प्रवास घडवते.

त्या काळी दख्खन ही चमत्कारांना प्रेरणा देणारी भूमी होती. इथल्या खजिन्यांची, राजेलोकांची ख्याती दूरवर पसरली होती. ही भूमी समुद्रापल्याडच्या प्रतिभावंतांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत होती. दख्खन हे आवेशपूर्ण धाडसांचे क्षितिज होते. इथे येणाऱ्या प्रवाश्यांना लष्करात भरती करण्यासाठी उपलब्ध असणारी युरोपिअन नेमबाजांची पथके; हिऱ्यामोत्यांनी सजलेल्या बाजारपेठा पाहायला मिळत. इथल्या दरबारांमध्ये पर्शिअन, मराठे, पोर्तुगीज आणि जॉर्जिअन यांची भरभराट होत होती. दख्खनमध्ये शेकडो भवितव्ये रचली गेली, जी मुघल साम्राज्यांच्या असंख्य पिढ्यांच्या भीतीदायक असूयेस कारणीभूत ठरली.

या पुस्तकात आपल्याला विजयनगर साम्राज्याचा नाट्यमय उदय आणि पाडावही पाहायला मिळतो; तसेच त्यांची सत्ता उलथून टाकणाऱ्या बहामनी राजांची आणि बंडखोर सुलतानांची षड्‌यंत्रेही पाहायला मिळतात. भारताच्या इतिहासातील मंत्रमुग्ध करणाऱ्या या काळाच्या प्रवासात आपल्यासमोर चांदबिबीसारख्या पराक्रमी राणीच्या हत्येसारखे थरारक प्रसंग, हिंदू देवतांची उपासना करणारा इब्राहिम दुसरा, मलिक अंबरसारखा इथिओपिअन सरदार आणि विजयनगरच्या हिरेजडित सिंहासनावर विराजमान झालेला कृष्णदेवराय अशी उल्लेखनीय ऐतिहासिक पात्रेही येतात. मध्ययुगीन भूतकाळातील विस्मरणात गेलेल्या प्रकरणावर प्रकाश टाकताना रिबेल सुलतान्स आपल्याला दख्खनमधील एका वेगळ्या युगाचे आणि एका वेगळ्या काळाचे स्मरण करून देते–एक असे युग ज्याने एका साम्राज्याचा अंत केला आणि भारताचे भविष्य नव्याने लिहिले.


About the Author


मनु एस. पिल्लई, द आयव्हरी थ्रोन: क्रॉनिकल्स ऑफ त्रावणकोर (2015) आणि रिबेल सुलतान्स: द डेक्कन फ्रॉम खिल्जी टू शिवाजी(2018) या विद्वानांकडून प्रशंसिल्या गेलेल्या पुस्तकांचे लेखक आहेत. ते संसदसदस्य शशी थरूर यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ होते. 2017 साली त्यांना साहित्य अकादमी युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इतिहास आणि अन्य विषयांवरील त्यांचे लिखाण मिंट लाऊंज, द हिंदू, हिंदुस्थान टाईम्स, ओपन, द न्यू स्टेट्समन आणि इतर प्रकाशनांमधून प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे तिसरे पुस्तक द कोर्टिजन, द महात्मा अँड द इटालिअन ब्राह्मिन नुकतेच वेस्टलँड प्रकाशनाद्वारा प्रकाशित करण्यात आले आहे.


तृप्ती कुलकर्णी या संस्कृत विषयाच्या अभ्यासक आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे त्या सात वर्षे अध्यापन करत होत्या. सध्या त्या ट्रान्स्लेशनपॅनाशिया, पुणे येथे संपादक म्हणून कार्यरत आहेत. इमोशनल इंटलिजन्स, गांधी अँड अली ब्रदर्स, सियालकोट गाथा ही त्यांची काही अनुवादित पुस्तके. विविध संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांनी सहाय्यक म्हणून काम केले आहे. संस्कृत नाट्यशास्त्र, वेदान्त हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. भाषा, साहित्य आणि चित्रपट या विषयांत त्यांना विशेष रुची आहे.


Review


‘Impressive . . . dazzling storytelling. Pillai has employed an extraordinarily powerful imagination and a prodigious talent with words to write a genuine thriller that is near impossible to shut before reaching the end’ Indian Express


‘Rebel Sultans provides the much-needed bridge between the isolated world of academia and wider public audience . . . Writing in an eloquent and lucid style, Pillai holds his readers spellbound through a sweeping narration’ The Hindu


‘One of India’s finest young historians’ Open


‘One of the brightest young writers in India today’ DailyO


‘Engaging . . . Rebel Sultans is a remarkable, daring book’ Hindustan Times


‘A fascinating book, with delectable minutiae in practically every page . . . Manu Pillai’s volume tells us, succinctly but with sufficient weight, the turbulent history of 500 years of the Deccan . . . [in] elegant, illuminating prose’ Outlook


‘Explores the rich tapestry of historical figures with nimble prose that in no way


compromises on academic rigour; the result is an enjoyable, illuminating journey into the middle India of yore’ Week


‘[A] fine book . . . [Pillai’s] approach is nuanced . . . He is convincing when he is assertive . . . [this] is scholarship’ Business Standard


‘Positively racy . . . a fast-paced greatest hits of the region’s medieval roller-coaster ride’ Scroll


‘For all its meticulous detail, Rebel Sultans is an enjoyable read’ India Today


‘A historian of note’ Mid Day


‘An engaging narrative, replete with riveting tales and compelling characters’ SouthWordRaise your Query?
Let's help